Sunday, March 20, 2011

एक्सिडेंटल डिस्कव्हरी

"(आय) नेल्ड इट !", आपल्या नवीन कम्प्युटर कीबोर्डच्या लाल आय - कि वरून दिमाखात बोट फिरवत रॉय उठला. " सलग १० तासाच्या एक्स्ट्रीम कोडींग सेशनमधून विजयी होऊन बाहेर पडण्याचा आनंद काही औरच. तुम्हा मिडल-क्लास क्लेरिकल कामं करणाऱ्या, ५ - १० हजार रुपड्यासाठी साहेबाची हांजी हांजी करणाऱ्या सरकारी नौकारांना नाही कळणार." आजूबाजूला पडलेल्या कोक , चिप्स, बियर , सिगारेटच्या पाईल मधून अडखळत बाहेर पडताना कामवाल्या बाईने लिहिलेली चिट्ठी त्याला सापडली. "म्या उद्या येनार न्हाय. पोरगी पोटशी हाय. डागदर म्हनला उंद्याची तारिक हाये..." "शिट, चीप वर्कर क्लास साला, कारणच पाहिजे दांड्या मारायला. उगाच नाही ह्यांच्या नशिबी धुणं भांडी येत. डिलीव्हरी डेट अशी लॉटरी मिळाल्यासारखी अचानक येत असते का कधी ?" तिसऱ्या मजल्यावरच्या खिडकीतून खाली बघताना समोरच्या रिक्षावाल्याच पोर त्याला गटारीतून क्रिकेटचा बॉल काढताना दिसलं. आपण काहीतरी घाणेरडा प्रकार करतो आहोत ह्याचा किंचितही विचार न करता ते पोर पुन्हा खेळायलाही लागलं. "कसं होणार याचं ... खर तर रोगराईला हेच कारण आहेत. ह्यांना कितीही पैसे द्या, सुविधा द्या, कधी सुधारणार नाहीत. पोरांना सांभाळायची औकात नाही तर काढायची ... " तेवढ्यात सेलफोन वाजला - अलेक्स कॉलिंग - "डोन्ट वरी अलेक्स, आय टूक केयर ऑफ इट. वुई शुड बी गुड नाउ..." आपल्या आयफोन वरच्या स्क्रीनवर खेळता खेळता रॉय पुटपुटला - "ह्या यु-आय वाल्यांना काही काम नको. इनमिन ३-४ बटण दाखवायची. १० - ५ क्लिक इवेन्ट लिहायचे पण त्यातही मिजास ह्यांची. अरे डेडलाईन कशी असते ते आम्हाला माहित खर तर. काम आम्ही करणार, क्रेडीटसाठी ही लोकं पुढ ..."

एव्हाना दुपारचे २ वाजले होते. आंघोळ करून रॉय खाण्यासाठी म्हणून उडुपी हॉटेलमध्ये गेला. अण्णानी आपलं नेहमीचं गिऱ्हाईक असल्याने "जारे पिंट्या, सायबांना काय पाहेल ते बग" असा हुकुम सोडला. "सॉफ्टवेयर इंजिनियर, आणि तो पण एका एम-एन-सी मध्ये म्हणजे काही साधी गोष्ट नव्हे. समोरच्या कुलकर्ण्यांचा मंदार मेक्यानिकल इंजिनियर असूनही आज १५ हजार महिन्यावर काम करतोय. ते सुद्धा फिरतीची नौकरी करून. नशीब आणि खडतर कष्टाचं फळ आहे कॉम्प्युटर इंजिनियर होणं ..." समोरच्या टेबलावर बसलेल्या दोन बायका (सरासरी शिक्षण इयत्ता ११ वी, सरासरी वय ५० वर्षे ) वेळ जावा म्हणून तोंडाच्या वाफा दवडत होत्या "आमचा संजू यंदा बारावी पास झालाय, काही झालं तरीही बाई मी त्याला कॉम्प्युटरलाच घालणार आहे. बाकीच्या फिल्डमध्ये आता काही राम उरला नाहीये." या दोन बायांचा हा संवाद नकळत रॉयच्या मनाला सुखावून गेला. ऑर्डर येईपर्यंत टाईमपास म्हणून शेजारी ठेवलेल्या अंकावर त्याचं लक्ष गेलं - आजच्या अंकाबरोबर पहा विवाहेच्छुक मुलामुलींसाठी रेशीमबंध ही पुरवणी. तुमचा प्रतिसाद कळवा, मुलामुलींचे पत्ते, फोन नंबर मिळवा. मासिक अंक फक्त १०० रु. मध्ये उपलब्ध ! पुरवणीवरच्या सुंदर मुलीच्या चित्राकडे पाहता पाहता त्याने नकळत माहिती वाचायला सुरुवात केली. "ब्राह्मण हवा, पोटजात कुठलीही चालेल, शक्यतो कोकणस्थ असावा, उच्च शिक्षित असावा, कॉम्प्युटर इंजिनियर चालेल, पुण्यात घर असावे, मोठ्या कंपनीत उच्च पदावर नौकरी करणारा असावा, निर्व्यसनी - मनमिळावू - जबाबदार .... " शब्दागणिक रॉयचा स्वताबद्दलचा रिस्पेक्ट आणि इतरांबद्दलचा तिरस्कार वाढतच होता. एक्स्पोनेन्शिअल ग्रोथ सारखा... शेजारच्या टेबलवर बसून बिडी मारणाऱ्या आणि डाव्या हाताने फुर्र फुर्र करत कटिंग पिणाऱ्या माथाडी कामगाराकडे शेवटचा "डीस्गस्टिंग .." लूक देऊन रॉय निघाला.

"बघतो मी आई. ऑफिसमध्ये विचारतो. मला २ दिवसाची सुट्टी काढून जावं लागेल." आईशी फोनवर बोलताना त्याला नाही म्हणायला पटकन काही कारण सुचलं नाही . आजोबांच्या पेन्शनच्या कामाला त्याला तालुक्याच्या ठिकाणी जावं लागणार होतं. बऱ्याच वर्षात रॉयने आजोळी चक्कर मारली नव्हती. कारणच नाही पडलं कधी. आधी अभ्यास आणि आता नौकरी - त्याला कारणांची कधीही कमतरता नव्हती. कर्जत तसं तालुक्यापेक्षा मोठ गाव, पण रॉयला पुणं सोडलं तर बाकी सगळ्यातच काही ना काही उण दिसायचं. बसमधली ती प्रचंड गर्दी, गावठी धोतर - सदरे - फेटे, त्यांचं दुनियाभरच सामान पोत्यात भरलेलं, बसच्या मधल्या भागातच पसारा मांडून बसलेल्या बायका आणि त्यांची रडकी पोरं. सगळं कसं किळस आणणारं. एशियाडने जायचा प्रश्नच नव्हता, ती कर्जतला थांबायला तर पाहिजे ना. जाण्याआधीच परत कधी येऊ असं झालं होतं रॉयला. ५ - ६ तासाच्यात्या छळातून कशीबशी त्याची सुटका झाली. कर्जतला धुळीचा लोट मागे उडवत ती बस एकदाची थांबली. घरचा वाडा विकून आता बरीच वर्षं झाली होती. स्वताच्याच आजोळी परकं वाटायला लागलं होतं. "ते तहसीलदारांच्या ऑफिसला कसं जायचं ?" शेजारीच उभ्या असलेल्या, त्यातला त्यात सभ्य वाटणाऱ्या माणसाला रॉयने विचारलं. "लाम हाय इतुन. तलाठ्याच्या हापिसला जीपड पकडून जावं लागतं. त्या वडाखाली मिळल बगा तुम्हास्नी गाडी." सभ्य माणसाने दोन दातांच्या फटीतून १२० - ३०० ची पिचकारी मारत सूचक उत्तर दिलं. रॉय जीपजवळ जाऊन थांबला. "तलाठी हापिस, तलाठी हापिस, १ शीट, १ शीट " एका सीटसाठी जीव काढणाऱ्या त्या ड्रायव्हरची तो वाट पाहायला लागला.

"अय पोरा, अय अय ... सूद आली का नाय अजून ? हिकडं बघ ..." एक अनोळखी माणूस एका हातात फोडलेला कांदा आणि दुसऱ्या हातात पाण्याचा तांब्या पकडून रॉयला उठवत होता. "तुज्या जीपला आक्षीडन झालाय. बाप्पाची किरपा म्हणून तू तेवडा जिता राईला." रॉयला शॉकमधून सावरुही न देता त्या माणसाने सगळे डीटेल्स सांगितले. "आर म्या म्हनतो हिकडं डोंगरावरच्या देवीला साडी नेशिव. येक वन बी न्हाई तुज्या आंगावर. चमत्कारच म्हनायचा." आयुष्याची ही असली भयाण क्षणभंगुरता अनुभवायची रॉयची ही पहिलीच वेळ होती. नम्ब होण काय असतं हे त्याला आता कळत होत. जे काय झालं ते सगळं विसरून जावसं वाटत होत त्याला. समोरच दारूचा गुत्ता दिसला, क्षणाचाही विचार न करता तो आत गेला. "कौन कम्बक्थ बरदाश्त करने के लिए पिता हैं, हम तो पीते हैं सब कुछ भुलाने के लिए ..." आतल्या गड्याला एक "चपटी" ची ऑर्डर देऊन सगळ्यात अंधाऱ्या कोपऱ्यात जाऊन रॉय बसला. एरव्ही चकचकीत टेबलवरती बसणाऱ्या माशिचाही राग राग करणारा रॉय आज देशी दारूच्या गुत्त्यात, कडवट विषारी वासात, अट्टल दारूड्यांमध्ये बसला होता. "काय दोस्ता, पैलीच पारी वाटत..." अतिशय घाणेरड्या वासापाठोपाठ एक मद्यधुंद पण गंभीर आवाज आला.एक ३५ - ४० वर्षाचा माणूस त्याला हसत विचारत होता, जणू काही त्याला हे असं जगण माहीतच होतं - नेहमीचंच झालं होत.

"पहिली म्हणजे ? तुमच्यासारखं रोज इकड पडलेला नसतो मी..." रॉयने चिडून उत्तर दिलं. पलीकडच्या त्या माणसाला कोण जाणे ते उत्तर फारच लागलं, दारूचा इफेक्ट असावा कदाचित. "पोरा, तुला म्हाईत नाही काय बी अजून. शिकला सावरलेला दिसतोयस, तुम्हा पोरांना ४ आकडे काय मोजता आले, त्या डबड्यापुढ बसून बटन काय दाबता आली, लय आक्कल आली असा वाटतं का काय ?" "कुणाच्या तोंडी लागतो आहे मी ... " रॉय पुटपुटला, तितक्यात तो माणूस रॉयच्या समोरच येऊन बसला. "माझं नाव संपत. असा बायल्यावानी काय बोलतु ? मर्द असशील तर मह्याबरोबर चल, तुला दावतो कुणाच्या त्वांडी लागतोयस ते ..." आता मात्र रॉय घाबरला. उसण अवसान आणीत म्हणाला "कुठ जायचं ?" " कुठ म्हंजे ? धंद्याचा टाईम हाये. दवाखान्यात चल. तुला दावतो कुट जात असतो म्या दारू ढोसून ते." का कोण जाणे, रॉयला संपत बरोबर जावस वाटलं आणि फारसा विचार न करता तो निघाला. कुठेतरी संपतच्या बोलण्यात सच्चाई वाटली त्याला. दारू पिऊन लोकं नेहमी खरच बोलतात हे खरोखर खरं असेल असं त्याला वाटलं. गुत्त्यापासून थोड्याश्या लांब अंतरावर असलेल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये संपत रॉयला घेऊन जात होता. हॉस्पिटलच्या दारातच दोन बायका हंबरडा फोडून रडत होत्या, एकीचा नवरा आणि एकीचा तरणाबांड मुलगा अपघातात वारला होता. समोरच उभा असलेला पोलीस इन्स्पेक्टर संपतला पाहताच "नवीन केस हाये, सायबान रिपोर्ट लौकर मागितलाय. पटापट उरक ..." असं म्हणाला. नुसतंच मान हलवून "हो " असं म्हणत संपतने रॉयला बरोबर येण्याचा इशारा केला. पोलिसाला पाहून दारूच्या नशेत असताना सुद्धा रॉयच्या आतला सुसभ्य आणि सुसंकृत माणूस "पोलिसाच प्रकरण आहे म्हणजे जरा चार हात लांब राहिलेलंच बऱ.." असा व्यावहारिक विचार करत होता. हॉस्पिटलच्या एका निर्जन कोपऱ्यातल्या रूममध्ये एक डॉक्टर संपतची वाट पाहत होता. आत आल्या आल्याच डॉक्टरनी संपतकड एक कागद दिला, "सुरु कर" असं सांगितलं आणि त्यानंतर रॉयने जे काही पाहिलं त्याने त्याची नशा खाडकन उतरली...

संपतने पांढरा गाऊन घातला होता आणि शक्य तितक्या निर्विकारपणे तो त्या डेड बॉडीवर हातोडा चालवीत होता... "माय जॉब सक्स ..." असं म्हणण वेगळं आणि अनुभव घेण वेगळ हे रॉयला आता कळत होत. पोस्टमॉर्टम करणाऱ्या माणसांच्या बाबतीत त्याने आधी ऐकलं होतं पण ते पाहायला सुद्धा मिळेल असं वाटलं नव्हतं त्याला. काय न्याय असतो ना देवाच्या दरबारी सुद्धा ? जिवंत माणसाच्या शरीराची चिरफाड करणाऱ्या डॉक्टरला मान सन्मान, प्रेताची चिरफाड करणाऱ्याला अशी वागणूक... दुसऱ्या माणसाबद्दल, तेही थर्ड क्लास काम करणाऱ्या माणसाबद्दल इतका विचार करणं त्याच्या स्वभावात बसत नव्हतं. साधारण अर्ध्या तासाने संपत रूमच्या बाहेर आला. आता त्याचीसुद्धा धुंदी उतरली होती. रॉयच्या डोळ्यात खोलवर बघत म्हणाला "पोट आहे, करावं लागत. तुला वाटत असणार बेवड्याला दारूपायी पैशे लागत असतील, म्हनून काहीतरी काम करतुया... बरोबरे तुझबी. बैलगाडी जशी बिना वंगचालत न्हाई तसा मी बिना दारूचा चालत न्हाई. चल घरला चल, चा पाजतो..." एका झोपडीवजा घरात गेल्यावर संपतने मुलीला चहा करायला सांगितलं. "हिच्यापाई जगतूया बास... बाकी काई बी न्हाई. बापजाद्याची जिमीन व्हती, भौबंदकीत तीबी गेली. दारुड्याबरोबर कोन ऱ्हानार, बायको सोडून गेली. गावातले लोक शेन घालतात त्वांडात, बायकुला संभाळता नाई आलं म्हनून. आता हिला शिकवायची हाय, लगीन करून द्यायचा हाय. पैका लागतो सगळ्याला, म्हनून हे सगळं. गावात दुसर कुनी असलं काम न्हाई करत. पन म्या म्हनतो भीक तर नाई ना मागत, जवर आंगात रग हाय, तवर म्या हे करनार. काम सोप्पं न्हाई ते, येक दिसात न्हाई केलं, तर मुडद्याला हात न्हाई लावता येत दुसऱ्या दिशी. एका मुडद्यापाठी २० रुपडे, असा भाव हाये माझा. " हे सगळ ऐकत असताना रॉय स्वताची त्या माणसाबरोबर तुलना करत होता. पहिल्यांदा कदाचित दुसऱ्या कुणाची डेडलाईन महत्वाची वाटत होती. अवरली रेट म्हणजे दुसरं काही वेगळं नसतं असंच वाटलं त्याला. "तू शहरातला हायेस, क्यामप्युटर चालवत असशील..." रॉयची तंद्री मधेच तुटली.. "हो बरोबर आहे, मी कॉम्प्युटर इंजिनियर आहे. पुण्याला काम करतो. घरी आई, बाबा, आजी, आजोबा असतात. इकड आजोबांचं पेन्शनच काम होतं म्हणून आलो होतो." चहाचा शेवटचा घोट संपवत रॉय उठला. (वाटलं नाही हे सगळ शिकायला मिळेल म्हणून ... ) मनातल्या मनातच रॉय पुटपुटला. "पुण्याला आला कि फोन करा, भेटू परत ... " आपला फोन नंबर एका चिठ्ठीवर लिहून देत रॉय निघाला. पेन्शनच काम संपवून घरी जाताना त्याला पहिल्यांदा कर्जतविषयी आपुलकी वाटत होती. कम्प्युटरच्या १४ इंच स्क्रीनच्या बाहेरसुद्धा एक जग आहे, आणि त्यातही संघर्ष आहे हे त्याला कळून चुकलं होत...

त्याच्या घराजवळच्या उडुपी हॉटेलमधल्या त्या माथाडी कामगाराबरोबर, चकचकीत कपड्यात एक कटिंग आणि एक सिगारेट मारताना त्याला पाहण आता कॉमन झालं होत !

Tuesday, September 21, 2010

शिव्या ... शाप की वरदान ?

भाषासमृद्धी असा काहीतरी शब्द खूप लहानपणी, दहावीत असताना कुठेतरी वाचला होता. तेंव्हा कोण्या एका विद्वानाने भाषा कोणत्या गोष्टींमुळे व्यापक बनते यावर एक खूप मोठा प्रबंध लिहिला होता. जशी प्रत्येक रिसर्च पेपर वाचताना होते तशीच मळमळ मला तेंव्हा सुद्धा झाली होती, आश्चर्याची गोष्ट म्हणजे मला तो विद्वान काय म्हणत होता हे समजत होतं. आणि त्याच्याही पुढे म्हणजे मी बऱ्याच मुद्द्यांवर त्याचाशी असहमत ही होत होतो. पण त्या काळी माझ्यातला लेखक हा लेखक कमी आणि मार्कांसाठी हपापलेला विद्यार्थी जास्त असल्याने तेंव्हा मी फारसा विचार केला नव्हता, प्लस तसे रसग्रहण टाईप चे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेत येत नाहीत असं "२१ - अपेक्षित" मध्ये लिहिलंही होतं, त्यामुळे त्याच्यासाठी वेळ देण्याचा काहीच संबंध नव्हता. आज वपुंच्या काही गोष्टी वाचत होतो आणि साईड बाय साईड विचारही चालू होता तेंव्हा मात्र मला रहावलं नाही आणि मग लिहायला घेतलं.

माझ्यामते कुठल्याही भाषेची खोली किंवा समृद्धी ही त्या भाषेत असलेल्या शब्दांनी मोजली पाहिजे. तुमच्या भावना तुम्हाला सहजतेने , अवघड शब्दांच्या कुबड्या न वापरता आणि अचूकपणे सांगता आल्या की ती भाषा समृद्ध, असा साधा रुल वापरला पाहिजे. शक्य तितके कमी व्याकरणाचे नियम, मामुली शुद्धलेखनाच्या अटी, आणि ऑटो स्पेल चेक / करेक्शन असलेली भाषा माझी सगळ्यात आवडती भाषा असेल. मराठी भाषा ही बऱ्यापैकी आवडत्या भाषेंच्या गटात येणारी ... कारण एकच - मराठीत असलेला असाधारण शिव्यांचा शब्दसंग्रह ! महाराष्ट्रातच बघा ना - खानदेश, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण ... प्रत्येक ठिकाणांनी आपली स्वतंत्रता जपली आहे. प्रत्येकाच्या शिव्यांचे कर्ते आणि कर्म एकच, पण सर्वनाम आणि विशेषनामांचे उच्चार आणि ढंग वेगळा, क्रियापद वेगळी - आपली स्वताची एक झलक दाखवणारी. काहींमध्ये ग्रामीण चावटपणा आहे तर काहींमध्ये शहरी सुबकता. काहींमध्ये मराठवाडी ठसका आहे तर काहींमध्ये मालवणी मसाला, काही ठेवणीतले शालजोडे मारणार तर काही सरळ तोंडावर बेछूटपणे सत्त्याहत्तर कुळांचा उद्धार करणार. काही "च्यामायला इंग्रजीतल्या शिव्यात काई दम नाई भो" असं छाती पुढे करून ठसकावणार तर काही "एफ - वर्ड्स" वापरण्यात आनंद मानणार. शिव्या देणं हे चांगलं की वाईट हा वेगळा मुद्दा आहे पण शिव्या देण्याची ताकद देणं ही त्या भाषेची खूप मोठी खुबी आहे असं मी मानतो.

मला सांगा - शाळेत असताना तुमची कधी मारामारी झाली असेल तर कोणत्या शब्दांनी तुम्हाला भांडायचं बळ दिलंय ? बालचित्रवाणीमध्ये ऐकलेल्या शब्दांनी की फटका खाल्ल्यावर त्या क्षणी मनात आलेल्या शिव्यांनी ? आजही जेंव्हा भारतात पाकिस्तानकडून दहशतवादी हल्ले होतात तेंव्हा पहिला शब्द काय येतो मनात ? "निषेध" की दुसरा काही ? खरं सांगायचं झालं तर शिव्या माणसाला माणूस बनवतात - त्याच्या मधलं animal instinct जागं ठेवतात. निसर्गाने दिलेल्या देणगीतली भावना नावाची गोष्ट दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याच काम करतात. पण जगातल्या अनेक दुसऱ्या चांगल्या गोष्टींप्रमाणे त्यांच्याकडं आजही वाईट नजरेनेच पाहिलं जातं. आजही शिवीगाळ करणारा माणूस हा अशिक्षित, असभ्य आहे असं समाजात मानलं जातं. वास्तविकत : शिव्या देणारा माणूस त्याच्या मनातलं सगळं बोलून दाखवत असतो, याचाच दुसरा अर्थ तो मनात काहीच ठेवत नसतो, याचाच तिसरा अर्थ तो "पोटात एक आणि ओठात एक" टाईप लोकांमध्ये येत नाही असा होतो.

आपल्याला ज्या सिस्टीमने शिकवलं आहे, त्या सिस्टीमच्या झापड लावलेल्या नजरेच्या बाहेर सुद्धा एक वेगळी दुनिया आहे हे जरा बघा एकदा. वर्षानुवर्ष लोकांनी सांगितलेल्या आणि आंधळेपणाने स्वीकारलेल्या गोष्टी बरोबर की स्वताला पटतं ते बरोबर हे बघा विचारून स्वताला. बघा एकदा शांत डोक्याने आणि स्वच्छंदी मनाने विचार करून ...

Friday, July 03, 2009

Tandoori night

Yesterday - Thursday, July 02, 2009 will be remembered as The Miraculous Day in the history of 207 Main Street. With the grace of Almighty and under the veteran guidance of a room mate Sushrut, coupled with a supreme power of world wide web; I cooked the first dish of my life -Tandoori Chicken. For those who do not think it as an extraordinary achievement for me, I will have to share some glimpses of my past.

I came to Binghamton in August 2008 and since then till yesterday I haven't cooked a single dish. I know, this is not something to be proud of but my room mates are so caring that they did not allow me to cook for last two semesters. Or if you see from other angle, they did not want to take risk of "swallowing" the food that I cooked. You see, medicines and clinical checkups are very costly here. This doesn't mean I was not helping in kitchen - but I was more of a rookie , just another guy who can "cut" vegetables, onions and anything for that matter. But now, I could be the most important person in the kitchen - someone who understands howto's of cooking. With this feather of "cook" in my hat, a sense of independence passed my mind. I felt like a free man after getting my first job, but the feeling of seeing myself as a cook was much stronger. Now that I can stand tall on my own feet, I don't have to listen to the blabbering of Sooraj, Sachin, Anurag and Rohan. No longer I will be known as a man who eats boiled eggs all (any ?) time !

I got a kind help from my room mates in this venture and also this link was really helpful in setting up the oven's temperature and adding some extra seasoning that we might have missed. This was the first time I learned that cooking is not difficult, it is more of an art than a science or a mundane task. All you need is a help of some hands, a really good recipe, and most importantly - a good heart, a huge appetite, a stomach (if you understand what I mean) and taste of a food lover ...

Looking forward to cook more ....

Appreciations, Encouragements, Teasing, What's so great in it ? like comments ... Welcome !

Thursday, May 14, 2009

MS renamed MJ - Masters of Jugaad

Jugaad - an arrangement or a work around, which have to be used because of lack of resources and/or will power.

Some people here in my university have enlightened my mind with this word by their exemplary performance. A google search on Jugaad gives some positive meanings also, but here I do not intend to mean it positively. For me, it is an act of using people ( by some uncanny tricks ) for your own benefits and getting rewarded for something which you do not deserve. A person who is known for such acts is called as Jugaadu in colloquial Hindi language.

I have been observing few people are getting extremely good grades in many subjects despite of their very little participation in doing things on their own. These people make a network of similar souls and share code, assignments and everything that they could share. Needless to say, they themselves do not put in infinitesimally small amount of time / efforts in making it happen, instead they ask for help to some of their friends ( here literal meaning of friends should not be taken into consideration. Friend for them is someone who can directly share rather give his code without even worrying about the consequences - and their "friendship" could break into pieces the moment a motive is achieved). Few days back, I was extremely agitated by some incidents and wanted to write about it, but my finals were approaching so did not really get time for that. Now that I am free, I will be kicking some serious asses today.

Copying somebody's work and putting it under your name is a crime in itself but many people disagree to this point. Chalta hain, dekha jayega, sab karte hain like statements are nothing but a cowardly act of supporting your baseless points. Someone who puts in efforts and works out things must get credit for his / her work. And somebody who is copying his / her work must get punished, I know I am sounding really harsh on this point but you would think exactly same if you were in my position. The root of this problem goes right into the mentality of human. Many of us (including me) want things to be available easily and readily and do not want to take efforts in making something work. But I think, higher education has offered me a chance to disprove the above statement and I should try my level best to do so. Some people do not seem to mind this fact seriously, though. All of them want to have a very high GPA and a very high paying job, but they want it without taking any pains. A jugaadu in general will find another talented / hard working guy and will do anything to please him / her , cause he / she is the one who is obviously doing all work and our friend is least bothered about it. I am not against making good teams but think everyone should have an active participation in their work if all of them want same grades. Some people are even more worse, they themselves don't know what is going on in their project and somehow end up getting close to 'A', and preach others how easy the subject was and how stupid others are. Such flavor of jugaadu gives me nothing but aggravation.

I would be more than happy if the problem ends here. But alas, as they say one rotten apple spoils the barrel, a jugaadu advocates and attracts someone with similar characteristics. When such people find a higher position in any hierarchy, they start expanding their vicious circle until the system becomes a big, intermingled web of mess. Many deserving candidates get nothing but rejection when such people make their decisions, and that is a serious problem. After that overwhelming incident few days back, I felt some people do not deserve a master's degree - forget about a job in United States.

But one can't help this - there are always some elements in every system who are corrupted and the system is functioning properly only because of some honest people. Fortunately God has given us that much ability to decide where we want to see ourselves.

Whatever - one thing is true - MS is no more Master of Science for me, it's Master of Jugaad !

Sunday, April 19, 2009

Words of wisdom

Many times one does not find wisdom in books, the pure and heavenly presence of wisdom can only be felt when you get to the state of enlightenment. Wisdom should not necessarily come from highly educated person, often some experiences of common man and quotes teach you so many things which you would never understand by reading books. To add to this argument, one does not have to use words with deep, mystic meaning. In fact, the simpler is the word, better is the effect. I always had a dream of being a truck driver since childhood, don't ask the reason but somehow I felt he understands world better than rest of us. Maybe because he has seen and explored world much more than you and me, he has a higher insight of complexities of human life.

My dream of being a truck driver shattered into pieces when I found engineers and doctors with their beautiful wives; realities of life and steep inclination towards materialistic things once again conquered the pure, pristine ambition of a child. It was going very routinely until yesterday the thought popped in my mind and I started it putting here. I would say that truck driver's contribution towards the human development is always neglected and considered inferior. I know the society is always biased towards intellects who are highly educated than the real wizards, but heck ! I will not second society on this, I have some examples which will prove that truck drivers also have equal depth of knowledge as that of the celebrated philosophers. I will be explaining meanings behind the one liners that you often find at the back of a truck, many of you mock it but I call it words of wisdom , so here it goes ( For those who do not have indic fonts installed mostly on Linux Box can install it from here ) -

चुन्नू मुन्नू दे पप्पा दी गड्डी |
- Don't laugh. It shows the earnest love of a father who is away from his family for many days because of the nature of his job. He is reviving memories of those unforgettable moments he spent with his offspring. I don't understand how come people remember those sad dialogues of A.K. Hangal in Sholay or Naseeruddin Shah's classic performance in Masoom and at the same time laugh at our driver's emotions.

दोस्ती पक्की, खर्चा अपना अपना |
- This is business buddy ! I have never seen any other better statement than this which clearly and succinctly expresses the boundaries between a friend and a parasite. If you know one, send it to me through a comment on this post.

खेतो पे किसान, सीमा पर जवान |
- I don't think there is any dispute over this line, as told in our 4th standard's social science's book , we all know Indian economy is highly dependent on it's agricultural development. And it is the truth that we have a sound sleep every night only because our jawans are trying really hard to protect our borders from intruders.

जगह मिलने पर साइड दी जायेगी |
- Many of us do not understand the simple meaning behind this line. It shows the clarity of thought and a level of maturity to understand need and urgency of others. How else a truck driver could convey his thoughts to someone who is behind him? They do not have high tech wireless radio systems to exchange words in case of urgency.

चलती है गाडी, उड़ती है धुल |
जलते हैं दुश्मन, खिलते हैं फूल ||
- Apparently, these two statements look unrelated, but as I said earlier, you need to keep your biased mind away in order to understand the hidden wisdom behind these lines. Our driver is saying that when someone makes progress, there are people who are always jealous of his / her achievements. But irrespective of their envious nature one has to keep travelling the path of glory. What a way to put things in such a simple words !

अमीरों की ज़िन्दगी बिस्कूट और केक पर |
ड्राईवर की ज़िन्दगी क्लच और ब्रेक पर ||
- I can see your laughing faces. But believe me, you need to have a heart and soul of a truck driver to understand the meanings of these lines. I am often amazed by seeing the driving skills of truck drivers and hence totally support this statement wholeheartedly.

नदी किनारे मैना बैठी, दाना खाए छल्ली दा |
तू तो राजा बन गया ड्राईवर, दिल ना लागे अकेली दा ||
- I don't know about you guys, but tears rolled on my cheeks when I first read these lines. Can you imagine the situation of driver's wife when he has to go for a long trip? Tell me, we see number of movies in which army men return to their posts on a very short notice, but why don't we apply same rule to truck drivers? Why is the approach so partial ?

पापा ना पियो शराब |
खरीद दो मुझे एक किताब ||
- Well, this is more of a self awareness kind of initiative. Yes, truck drivers are also human beings and they also need some education. And they don't want it to be told in a complicated manner. I appreciate the honesty behind these lines.

१८ के फूल, ८४ की माला |
बुरी नज़र वाले तेरा मुह काला ||
- I am a strong believer of believes, some of you guys derogatorily call it as superstitions. Since this is very close to truck driver's religious beliefs, let's not comment on it.

क्या साथ लाया है, क्या साथ ले जायेगा |
खाली हाथ आया था, खाली हाथ जायेगा ||
- See some similarity? Raksesh Roshan should be sued for stealing these lines. I think, now you people's perspective towards drivers should change significantly. If you trace the roots of these lines, you will find it in Bhagwad - Geeta.

मालिक की गाड़ी, ड्राईवर का पसीना |
चलती है रोड पर बनके हसीना ||
- This is my personal favorite. Truck driver's profession is still in demand because of these lines. See the self esteem and self respect ? Such lines make me still follow the good old dream of mine. It portrays a responsible, hard working and carefree bird like attitude of a driver which gives him the strength to walk the less traveled road. Hats off to your attitude guys !

Finally, I want to conclude - truck drivers are not like the one which we see in Hindi movies, they are normal humans like us with emotions. They also have problems and dreams like all of us. I honestly expect after reading this post, you guys will start respecting truck drivers in a same sense as you do with doctors, engineers and so called professionals.

Comments, suggestions, more words of wisdom are most welcome !